Saturday, March 29, 2008

जनता शर्मिंदा है

महाराष्ट्र राज्य विधान सभा ने महाराष्ट्र राज्य के मुख्य चुनाव आयुक्त नन्दलाल को जेल भेज दिया गया महाराष्ट्र राज्य विधान सभा एक संवैधानिक संस्था है तो क्या महाराष्ट्र चुनाव आयोग एक संवैधानिक संस्था नही है ? मेरी जानकारी मे महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग भी एक संवैधानिक संस्था है । हमारा मतलब यहाँ नन्दलाल नामक व्यक्ति से कत्तई नही है हमारा मतलब तो महाराष्ट्र के चुनाव आयुक्त से है । यहाँ पर अपने पद की गरिमा का ध्यान नही रखा जा रहा है और न ही दुसरे के पद की गरिमा को स्वीकार किया जा रहा है ।
नन्दलाल को कल १०.३० बजे आर्थर रोड जेल से छोड़ दिया गया इसके पश्चात वे महाराष्ट्र राज्य विधान सभा की विशेषाधिकार समिति द्वारा दी गई सजा के खिलाफ मुम्बई उच्च न्यायालय मे चले गए इधर महाराष्ट्र राज्य विधान सभा ने प्रस्ताव पास कर दिया कि न्यायालय की कोई नोटिस विधान सभा स्वीकार नही करेगी न्यायालय भी एक संवैधानिक संस्था है ।
विधान सभा भी एक संवैधानिक संस्था है...महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग भी एक संवैधानिक संस्था है.....मुम्बई उच्च न्यायालय भी एक संवैधानिक संस्था है.................
यहाँ अपनी मर्यादा का आदर नही, दूसरो के मर्यादा का आदर नही, कोई संयम नही, कोई अनुशासन नही महाराष्ट्र के जनप्रतिनिधियों का यह व्यवहार उन्हें शर्मिंदा नही कर रहा है ? उनके इस कृत्य से महाराष्ट्र का प्रबुद्ध वर्ग और जनता जरुर शर्मिंदा है ।

Friday, March 28, 2008

एक विचारधारा

भारतीय नागरिक हूं। दिल और दिमाग दोनों से। यहां की हर एक विचारधारा का सम्मान करता हूं। जहां अच्छाई होती है, खुल कर प्रशंसा करता हूं और जहां बुराई होती है, थोड़ा मुंह फेर लेता हूं या हल्क लहजे में उसकी बुराई कर देता हूं।
कांग्रेस, भाजपा और वामपंथियों तीनों की अपनी-अपनी विचारधारा है। इन तीनों के विचारों का मैं सम्मान करता हूं। लेकिन इनके कृत्यों पर अपना पक्ष भी रखता हूं। यह लोग विचारों की राजनीति नहीं करते हैं। यह कुर्सियों की राजनीति करते हैं।
84 के दंगों के बारे में कांग्रेसियों को बोलिये या फिर भगवा रंग वालों को गोधरा या बाबरी मस्जिद के बारे में, इनका रुख तीखा और थोड़ा आरोप देने वाला हो जाएगा। ठीक इसी प्रकार नंदीग्राम और कन्नूर की घटनाओं के बारे में जवाब देते हुए वामपंथियों को तकलीफ देती हैं।
अब आम इंसान को उसके विचारधाराओं की गलतियों की ओर इंगित करेंगे तो वह आप पर आग बबूला हो या तो गाली देना शुरू करेगा या फिर दूसरे विचारधारा वाले की गलती को बताना शुरू कर देगा। यह कुछ ऐसा है, मेरी कमीज तेरी कमीज से कम गंदी है।
इसका सबसे अच्छा सबूत हमेशा तथाकथित बुद्धिजीवी ही पेश करते हैं। चाहे वो हमारे सम्मानीय नेतागण या मेधा पाटकर सरीखे समाजसेवी

Sunday, March 9, 2008

प्रतापराव गुजर

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.
यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.
पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं - सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
______________________________________
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार - पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्तारण सोडूनी सेनासागर अमुचे पळताअबलाही घरोघर खऱ्या लाजतील आताभर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातीलजाळीत चालले कणखर ताठर दील“माघारी वळणे नाही मराठी शीलविसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठछातीवर तुटली पटबंधाची गाठडोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठम्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठजरी काल विसरलो जरा मराठी जातहा असा धावतो आज अरि-शिबिराततव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओलेसरदार सहा, सरसावूनी उठले शेलेरिकिबीत टाकले पाय, झेलले भालेउसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेनाअपमान बुजविण्या सात अर्पूनी मानाछावणीत शिरले थेट भेट गनिमांनाकोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनीसमशेर उसळली सहस्र क्रूर इमानीगर्दीत लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचाओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचाअद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा
मग करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद
असावा कधीतरी छोट्या
भांडणाचा एखादाच अपवाद असावा
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा
एक तरी मैत्रीण असावी

वाद पहिलेपणाचा : आद्य मराठी वृत्तपत्र कोणते?

पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्‍चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता."दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे. तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले."दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्‌स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता. हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.संदर्भ :वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 54 ते 56.