Tuesday, February 12, 2008

दुर्दैव मराठी माणसाचं

ऋषीचं कुळ आणि नदीचं मुळ कधी शोधू नये म्हणतात. आता मुंबईचंही मुळ कधी शोधू नये म्हणण्याची वेळ आली नसली तरी ती आणखी पन्नास वर्षांनी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा कदाचित मराठी माणूस मुंबईचं मुळ शोधायला गेला तर त्याला वेदना जरूर होतील. ज्या प्रकारे मराठी माणसाचा प्रवास सुरू आहे त्यावरून तरी असंच वाटतं..

1906 च्या आसपास मुबंईची लोकसंख्या 10 लाख होती. 1970 ला ती एक कोटींच्या आसपास पोहचली. 1966च्या आसपास मुंबईची लोकसंख्या वाढू लागली. त्यात दाक्षिणात्य लोकांचा भरणा होता. वडापावच्या ऐवजी रस्त्यावर डोसा आणि इडलीच्या गाड्या दिसत होत्या.... तेव्हा मराठी माणसाच्या मनात परप्रांतीयांविषयी परक्याची भावना तयार झाली.. दाक्षिणात्यांच्या दादागिरीमुळे मराठी माणूस वैतागला होता. तेव्हाच शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसाला आधार मिळाला. शिवसेना जोमानं वाढली. सेनेची दहशत परप्रांतियांवर बसली. मग शिवसेना मुंबईतल्या कामगार आंदोलनाकडेही वळली. गिरणी कामगारांच्या प्रश्नात एक भूमिका बजावून वेगळा ठसा उमटवला. या सर्व आंदोलनामुळे 1985 ला शिवसेनेला मुंबई महापालिकेतही जाता आलं. मुंबई महापालिकेची सत्ता मिळवल्यावर सेनेचा विजयरथ धावू लागला तो आजतागायत.. मुंबईवर आजही शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. म्हणजेच मराठी माणसाची सत्ता आहे. पण दुर्दैवाने मुंबईच्या 227 प्रभागात मराठी माणसाचं वर्चस्व नाही.

1947 ला देश स्वतंत्र झाला. 1 मे 1960 ला मुंबईसह महाराष्ट्र झाला, मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठी अस्मितेचा होता. म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत मुंबईवर मराठी माणसाचीच मस्ती चालायची. पण ही मस्ती चालताना मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यास मात्र प्रयत्न झाले नाहीत.

सध्या मुंबई महापलिकेत सुमारे लाखभर कर्मचारी आहेत. त्यापैकी ९८ टक्के मराठी भाषक आहेत. मुंबईत 43000 पोलीस कर्मचारी आहेत. त्यापैकी 98 ते 99 टक्के मराठी भाषिक अधिकारी आहेत. प्रशासनातही मराठी माणसाची संख्या 85 ते 90 टक्क्यांवर जाते. 80च्या दशकात मराठी नगरसेवकांची संख्याही अशीच होती. आमदारही मराठीच जास्त होते आणि खासदार तर सर्वच मराठी असायचे. आज परिस्थिती बदलली आहे. मराठी नगरसेवक, आमदार, खासदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जे आहेत त्यांनी  मुंबईला वाचवण्यासाठी किंवा मराठी माणसाला मुंबईत टिकवण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही.

पालिका अधिका-यांचं काय काम असतं ... रस्त्यावर फेरीवाले होऊ न देणं, मोकळ्या जागांवर अनधिकृत बांधकाम होऊ न देणं, हाही त्यांच्या कामाचा भाग आहे. पालिकेत वसलेल्या मराठी माणसानं काय केलं... महिन्याला पाचशे-हजार रूपयांची लाच घेत रस्त्यावर फेरीवाले बसू दिले, जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांवर झोपड्या होऊ दिल्या. पाण्याच्या लाईन्स फोडू दिल्या. आणि हे सर्व मराठी माणसासाठी नव्हतं. ते होतं..परप्रांतीयांसाठी... म्हणूनच तर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर फेरीवाले बसलेले दिसताहेत. हे फेरीवाले फूटपाथवरून आता रस्त्याच्या मध्ये येऊन बसताहेत. जरा डोळे उघडून बघा, त्यातले किती लोक मराठी आहेत.. तुम्ही मध्यम वर्गीय आहात का?... किंवा झोपडपट्टीत राहता का, मग तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल आणि अनुभवलंही असेल.. आपलं कुणा बाजूवाल्याचं घर बनवताना पालिकेचे अधिकारी येउन काय म्हणत होते.. परमिशन आहे का.. तुमच्या मनात नक्कीच आलं असेल, आम्ही हक्काचं घर बनवतो, घरात संख्या वाढली म्हणून जरा दुरूस्त करून घेतोय. हे बोलताना कदाचित तुम्हाला पालिकेच्या अधिका-यांनी पैसे मागू नयेत, घर दुरूस्त करू द्यावं, ते तोडू नयेत, असंही वाटलं असेल. पण तुमच्या वाटण्यापेक्षा त्या अधिका-याला तुम्ही दिलेले पैसेच महत्त्वाचे वाटले असतील. खरं आहे ना...

कांदिवली, बंदरपाखाडी, मालाड, अंबोजवाडी, चेंबुर- शिवाजी नगर, गोवंडी, कसाईवाडा, जोगेश्वरी पूर्व, सेनापती बापट मार्ग, मरोळच्या कॅन्सर हॉस्पिटलची जागा काही वर्षांपूर्वी मोकळी दिसायची, आता मात्र तिथं झोपड्या झाल्या आहेत आणि या झोपड्यांना मराठी माणसांच्याच सरकारनं म्हणजे युती सरकारनं 1995 पर्यंत तर आघाडीच्या राज्य सरकारनं 2000 सालापर्यंत कायद्यानं संरक्षण दिलं आहे. कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेवर असणा-या झोपड्यांना जागाही द्यायचं मान्य केलंय. पोलिसांचं काम काय असतं... कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच फेरीवाले, झोपडीदादा यांच्याकडून सामान्य माणसांना त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेणं.. पोलिसात बसलेल्या मराठी माणसानं काय केलं... बसलेल्या फेरीवाल्याकडून दिवसाला दहा ते शंभर रूपये उकळले. पोलीस कंट्रोल रूममधून रस्त्यात बसलेला फेरीवाला किंवा झोपडीदादाच्या विरोधात कॉल आला तर त्याच फेरीवाला आणि झोपडीदादाला आगाऊ कल्पना देऊन आपल्या पुड्या बांधल्या. चायनीजच्या गाड्या चालवून दारू विकणा-या फेरीवाल्याकडून महिन्याचा हफ्ता घेण्यातही याच मराठी पोलिसांनी कुचराई केली नाही. त्याचा काय परिणाम दिसतोय.. रस्त्याच्या चौका-चौकात हाय वे वर, उपनगराच्या कोणत्याही गल्लीत किंवा बसस्टॉप किंवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला चायनीज, चहावाले, आणि फ्रूट सॅलाड विकणारे दिसताहेत... शोधा... यापैकी कितीजण मराठी आहेत ...

जागा राज्य सरकारची असो अथवा महापालिकेची.. गेल्या पंचवीस वर्षांत हजारो बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावण्यात आल्या. ही कागदपत्र तयार कऱणारा अधिकारी कोण होता? मराठी माणूसंच, महापालिकेतला, रेशनिंग ऑफिसमधला, जिल्हाधिकारी कार्यालयातला आणि पोलीस ठाण्यातला. पण कागदपत्र तयार करण्यात येत होती ती कुणासाठी? मुंबईतल्या मोकळ्या जागा ज्यांनी बळकावल्या त्यांची यादी काढली तर त्यात परप्रांतीयांचाच भरणा अधिक दिसेल. नगरसेवकांचं काम काय असतं.. लोकांची सेवा करणं.. म्हणजेच चालायला मोकळे रस्ते उपलब्ध करून देणं, उद्यानं आणि शाळा यांच्यासाठी प्रशासनाकडे किंवा महापालिकेकडे पाठपुरावा करणं, यापैकी नगरसेवकांनी काय केलं ... मुंबईतल्या कोणत्या भागात मोकळे रस्ते आहेत, चालायला नीट फूटपाथ आहे.. मुलांना खेळायला मैदानं आहेत... आणि हो.. महापालिकेत असणा-या मराठी नगरसेवकांनं काय केलं.. फेरीवाले बसले तर त्याच्याकडून चिरीमिरी घेतली. बॅनर्स किंवा पोस्टर्स लावण्यासाठी एक-दीड हजार रूपये घेतले किंवा हे बॅनर्स आणि पोस्टर्स स्पॉन्सर करून घेतले. एखादा मोठा चायनीजवाला असेल तर एखाद्या कार्यक्रमासाठी रक्कम घेतली. फेरीवाल्यांना यासाठीच विरोध केला नाही कारण त्याने विरोधात मतदान करू नये.. झोपडीदादा जागा लाटत होते तेव्हा नगरसेवकांनी काय केलं... झोपडीदादाला विरोध केला नाही. मोकळ्या जागेवर झोपड्या उभारू दिल्या, मैदानात अतिक्रमण होऊ दिलं आणि फेरीवाल्यांवर कारवाई होणार असेल तर स्वतःच्याच फोनवरून महापालिकेची गाडी येत आहे जरा सांभाळून रहा... शक्य झाल्यास कुठल्यातरी गल्लीत लपून रहा असा आपुलकीचा सल्लाही दिला. हे सर्व करणारा कोण होता... मराठी नगरसेवकच होता.. आणि हे सर्व कोणासाठी होतं... आमदारांचं आणि खासदारांचं काम काय असतं... आपल्या मतदार संघाचा विकास करणं म्हणजेच मोठे प्रकल्प राबवून रस्ता, पाणी आणि इतर सुविधांचा पाठपुरावा कऱणं.... आमदारांनी काय केलं... निवडणुका आल्या की मराठी माणसासमोर हात जोडले.. शिवाजीमहाराजांचं आणि शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेऊन मतं मागितली आणि परप्रांतीय कार्यकर्त्यांना म्हाडा, आणि महापालिकेत ठेके मिळवून दिले. या आमदारांना निवडून कुणी दिलं होतं.. मराठी माणसानं... आणि आमदारांनी काम कुणाचं केलं...

1966 सालापासून मराठी माणसानं शिवसेनेला आपलं मानलं आहे.. मुंबई महापालिकेची सत्ता देतानाच 1995 साली राज्याचीही सत्ता दिली. पाच वर्ष शिवसेना भाजप युतीनं काय केलं.. झुणका भाकरचे स्टॉल आणि वडा पावच्या गाड्या देण्याव्यतिरीक्त युतीच्या सरकारनं मराठी माणसाला रोजगारासाठी काय दिलं.... महापालिकेत बसणा-या सेनेच्या नगरसेवकांनी किती जणांना नोक-या लावल्या... नगरसेवकांनी मुंबईला आपलं मानलं नाही. जनतेकडून मिळालेल्या पदाला त्यांनी आपलं मानलं. नगरसेवक शिवसेनेचा असो की काँग्रेसचा तो कधीही मुंबईशी प्रामाणिक राहिला नाही.. वाढत्या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

मुंबईत जी सुलभ शौचालयं दिसतात. त्यापैकी 90 टक्के परप्रांतीयांची आहेत... त्यातून महिन्याला 15 ते 20 किंवा 30 हजार रुपये मिळतात.. खर्च किती आहे.. फक्त 5 ते 8 हजार... महिन्याला 20 हजार रूपये घरी बसून मिळतात. मुंबईच्या नगरसेवकांना ही शौचालयं मराठी माणसांना द्यावीत असं सांगितलं होतं. कुणीच ऐकलं नाही.. नव्हे त्यांना याचं महत्व पटलंच नाही. फक्त दहा पंधरा हजार रूपये घेउन परप्रांतीयांना ती बांधून दिली. आज जे शौचालय चालवतात ते पूर्वी हातात फाईल घेऊन फिरायचे.. आता ते होंडा सीटीतून फिरतात आणि मराठी मुलं त्यांच्या हाताखाली काम करतात..

बाहेरचे लोक इथं येतात. येताना भाऊ, नातेवाईक, मित्र आणतात. पण मराठी माणसानं आपल्या किती बेरोजगार भावांना, नातेवाईकांना मित्रांना आणून रोजगार दिला.. उत्तर भारतीय माणूस आपल्या माणसाला आधार देतो. पण मराठी माणूस आपल्याच माणसाला दूर ठेवतो मग भले तो सख्खा भाऊ का असेना.. उत्तर भारतीयांना भडकावून मराठी माणसाला डिवचण्याचं काम उत्तरभारतीय नेते करत आहेत. पण बिहारमधे आणि उत्तर प्रदेशात विकास का होत नाही याचा कुणी विचार करताना दिसत नाही.. त्यांच्या विरोधात का लाठ्या उगारत नाहीत... ब्रिटीशांनी बनवलेलं रेल्वे स्टेशन आजही आपण वापरतो.. त्यांनी 80 वर्षापूर्वी टाकलेली पाण्याची लाईन आजही चांगल्या अवस्थेत आहे... त्यांना दूरगामी विचार होता.. तोही परक्या माणसांचा... दुस-या देशातल्या माणसांचा..

मराठी माणूसही पुरोगामी आहे.. तो.. हुशार आहे... देशविदेशात किर्ती मिळवतोय.. त्याच वेळी... त्यांचाच भाऊ मुंबईत पोरका होतोय....हे कशाचे द्योतक आहे... दुर्दैव मराठी माणसाचं ... आणि काय... ?...

Wednesday, February 6, 2008

न्यायपालिका और गरीब

अगर किसी से भी यह पूछा जाए कि देश की न्यायपालिका के दरवाजे तक सही मायने में कितने लोग पहुंच पाते हैं? तो नि:संदेह ! उत्तर होगा ''आधे से भी कम''। वजह- हमारी न्यायिक व्यवस्था। जिसे गुलामी के दिनों में अंग्रेजों ने अपने लिए बनाया था। अंग्रेजों की न्यायिक व्यवस्था ने हमेशा से आम आदमी को इंसाफ दिलाने के बजाय अंग्रेजों का साथ दिया ताकि भारतीय उनके गुलाम बने रहें। यही वजह है कि न्यायिक प्रक्रिया के लिए न केवल अंग्रेजी भाषा इस्तेमाल की गई बल्कि उसे इतना जटिल बना दिया गया है कि आम आदमी वकीलों की मदद के बिना तो वहां तक पहुंच ही नहीं सकता। ड्रेस कोड भी जानबूझकर आम आदमी के दिलों में व्यवस्था के लिए खौफ पैदा करने के लिए बनाया गया था। किसी भी अपराध के लिए दोषी ठहराए गए आदमी के लिए खुद को बचा पाना नामुमकिन है। वह पूरी तरह से पुलिस और न्यायपालिका की दया पर निर्भर है, क्योंकि उसे तो कोर्ट की भाषा समझ में आती नहीं, तो 'कोर्ट' अकेले ही सारी प्रक्रिया निपटा लेता है। इससे भी कड़वा सच तो यह है कि देश की इतनी बड़ी आबादी के लिए बनाई गई न्यायिक व्यवस्था केवल कागजों पर ही नजर आती है। ऐसी व्यवस्था गरीबों को इंसाफ दिलाने का साधन हो ही नहीं सकती।70 के दशक के उत्तरार्ध्द में जब जस्टिस भगवती-कृष्ण अय्यर ने जनहित याचिका की परम्परा बनाई; तक यह सोचा गया था कि एक ऐसा यंत्र है जो गरीब की रोजी-रोटी और अधिकारों की रक्षा के लिए स्वयं नागरिकों द्वारा ही सर्वोच्च अदालत की भूमिका निभाई जाए और न्यायालय गरीबों के अधिकारों की रक्षा के लिए आम जनता की ओर से काम करे। तभी सर्वोच्च न्यायालय ने मौलिक अधिकारों को विस्तार से परिभाषित किया। यह परिभाषा खासकर संविधान के अनुच्छेद-21 में दिये गए 'जीवन के अधिकार' के संबंध में थी। अनुच्छेद 21- में 'सम्मान से जीने का अधिकार' शामिल किया गया और सम्मानपूर्वक जीने के लिए भोजन, आवास, शिक्षा, स्वास्थ्य आदि जैसी बुनियादी जरूरतें पूरी होनी चाहिए।इसलिए 80 के दशक में लीक से हटकर भी कुछ फैसले लिए गए। बेगार पर रोक, कामगारों के लिए न्यूनतम मजदूरी, बंदीकरण सुरक्षा के अधिकार, पागलखानों में सुरक्षित परिस्थितियां, बेघर-फुटपाथियों के अधिकार आदि कई मुद्दों पर न्यायालय ने सकारात्मक रवैया अपनाया। लेकिन 90 के दशक में उदारीकरण के युग में गरीबों के प्रति उच्च न्यायालयों का रूख धीरे-धीरे बदलता गया। अब तो यह आलम है कि न्यायालय आम आदमी के लिए जीविका, आवास, आजादी आदि सुविधाएं मुहैया कराने के लिए सरकार को निर्देश देने से भी पीछे हट रहे हैं। यहां तक कि अपने ही दिये हुए पुराने निर्णयों को ही नकार रहे हैं। वे निर्णय जो गरीबों के लिए आवास, भोजन, स्वास्थ्य और शिक्षा के कोई प्रबंध न होने की वजह से पूर्व में न्यायपालिका द्वारा दिऐ गए थे।आज गरीब आदमी 'नव आर्थिक उदारीकरण' की नीतियों की मार झेल रहा है। उसकी जमीन, पानी और रोजी-रोटी राज्य द्वारा कब्जाई जा रही हैं ताकि सबकुछ बड़ी-बड़ी बहुराष्ट्रीय कम्पनियों और धन्ना-सेठों की खनन, सेज और दूसरे बड़े-बड़े प्रोजेक्टों, आदि के लिए दी जा सकें। ऐसे में न्यायालयों को उन गरीबों की मदद के लिए आगे आना चाहिए था, जिनके अधिकार छीने जा रहे हैं। गरीबों के लिए कुछ करना तो दूर, न्यायालय उन संस्थाओं और लोगों की आवाज भी नहीं सुन रहे हैं, जो इन गरीबों के लिए न्याय की गुहार लगा रहे हैं।न्यायालयों में आजकल गरीब विरोधी निर्णयों का तो फैशन ही चल पड़ा है। मध्यम वर्ग और उच्च वर्ग द्वारा दायर किए जनहित मुकद्मों में जो न्यायालय गरीब-पक्षधर सकारात्मक रूख अपनाते थे, दुर्भाग्यवश आज वे ही अपने फैसलों से गरीबों से आवास, व्यवसाय, रोजी और यहां तक कि आजादी भी छीन रहे हैं। बहुत से मामलों में तो देखा यह जा रहा है कि कोर्ट गरीबों को नोटिस तक देने की जहमत नहीं उठा रहे हैं, जिनके घरों को उनके फैसले पर उजाड़ दिया गया, रोजी छीन ली गई है और आजीविका एक ही पल में मिट्टी कर दिए गए और इस सबको 'कानून का शासन' नाम का जामा पहनाया जा रहा है। अमीरों को साफ-सुथरा पर्यावरण देने के कानून के लिए शासन के नाम पर गरीबों को सरकारी जमीन पर बने उनके मकानों में रहने से रोका जाता रहा है। जैसे कि दिल्ली और मुम्बई में हमने देखा कि एक ओर तो उच्च-मध्यम वर्ग की कॉलोनियों के पास बनी गरीबों की झुग्गियों की उजाड़ दिया गया तो दूसरी ओर दिल्ली की सड़कों से साइकिल और रिक्शा चलाने वालों को महज इसलिए हटा दिया गया, ताकि मध्यम और उच्च वर्ग के अमीरजादों को कार में घूमने का रास्ता साफ/क्लियर मिल सके।ऐसा लगता है कि इन निर्देशों के पीछे 'कोर्ट' और सरकार की मिलीभगत है, क्योंकि सरकार दिल्ली में यमुना पुश्ता पर बनी झुग्गियों को हटाना चाहती थी ताकि उस जमीन पर फाइव स्टार होटल और शॉपिंग माल्स बनाए जा सकें। सरकार में इतना दम नहीं था कि वह राजनीतिक रूप से इन झुग्गियों को हटाती। वजह, चुनाव में हर पांच साल बाद वोट भी तो लेने होते हैं। सो इसने न्यायपालिका के कंधे पर रखकर बंदूक चलाई, क्योंकि न्यायपालिका लोकतांत्रिक या अन्य किसी भी तरह से, किसी भी प्रकार के संस्थान के प्रति जवाबदेह नहीं है। यह बड़ी आसानी से ऐसे आर्डर पास कर सकती थी, खासकर तब; जबकि फैसले इस वर्ग (न्यायपालिका के इलीट वर्ग) के भी अनुकूल थे। पिछले कुछ सालों से जिस तरीके से कामगारों और मजदूरों के लिए बने कानूनों को बिगाड़ा है। उससे सरकार और न्यायपालिका की जालसाजियों की सारी पोल खोल दी है। जैसे ही आर्थिक नीतियों का उदारीकरण किया गया और विदेशी कंपनियों को भारत में दुकानें खोलने के लिए बुलाया गया तो उद्योगों ने श्रम कानूनों को भी कम करने के लिए कदम उठाए और हवाला दिया कि देश को नए श्रम सुधारों की जरूरत है। इन सुधारों से श्रमिकों को मिली हुई सुरक्षा खत्म हो जाएगी और उन्हें अपने मालिकों की दया पर जीना होगा।इसके बाद की सरकारों के लिए श्रम कानूनों को खत्म करना जरा मुश्किल था क्योंकि वे सभी वामपंथी पाटियों के सहयोग पर निर्भर थीं या फिर उन्हें कामगारों और गरीबों से अगले चुनावों में वोट न मिलने का भी खतरा था। लेकिन तभी फिर से 'न्यायपालिका' में सुविधाजनक रास्ता खोज लिया गया और न्यायपालिका ने बड़ी ही सफाई से मजदूरों की सुरक्षा के लिए बने कानूनों पर अपनी कैंची चला दी। इन कानूनों की नई परिभाषाएं देकर गरीब मजदूरों को कर्ज और मुफलिसी की जिंदगी के जीने का फरमान सुना दिया। 'कांट्रेक्ट लेबर एक्ट' तो एक तरह से खत्म ही हो गया है, क्योंकि एक के बाद एक मुकद्मे होने के बावजूद भी न्यायालय इसे लागू करने से इनकार कर रही हैं। सर्वोच्च न्यायालय तो इनसे भी एक कदम आगे चला गया और कहा कि 'न्यायालय अपनी राज्य सरकार की आर्थिक नीतियों के अनुसार श्रम कानूनों को परिभाषित कर सकती हैं।' इसी तरह सर्वोच्च न्यायालय की एक अन्य बेंच ने भी सरकार के उस फैसले को उचित ठहराया जिसमें उसने मॉरिशस में रजिस्टर्ड किसी 'एक पोस्ट बॉक्स कम्पनी' को 'इण्डो-मॉरिशस डबल टैक्सेशन अवाइडेंस एग्रीमेंट' का लाभ उठाने की अनुमति दे दी और इस तरह भारत को कोई भी टैक्स न देने का रास्ता साफ कर दिया। अब यह भारत में काम कर रही सभी विदेशी कंपनियां इसी रास्ते पर चल रही हैं। इसका मतलब यह हुआ कि अब सरकार ऐसे आदेश देकर कम्पनियों को कर से छूट दे सकती है। यह तो एक व्यवस्थित संसदीय-प्रक्रिया का भी माखौल है क्योंकि संसद केवल वित्त विधेयक द्वारा ही करों में छूट आदि के कानून बना सकती है।नक्सलियों, माओवादियों या फिर मानव अधिकारों के लिए लड़ने वालों के अधिकारों और स्वतंत्रताओं के मामलों में भी न्यायालयों का अनुदारवादी और फासीवादी रूख नजर आ रहा है। राज्यों ने जिन लोगों को नक्सलवादी और माओवादी करार दिया, उनकी अपीलों के साथ जिस तरह न्यायालय ने व्यवहार किया और जिस तरीके से समाजसेवी डॉ. विनायक सेन की जमानत नामंजूर की, वह सब इस बात की तरफ इशारा करता है कि कुछ न्यायधीशों ने फासीवादी रूख अपनाने का मन ही बना लिया है।अब यह बात साफ हो गई है कि अब न्यायपालिका गरीबों पर अत्याचार करने, भयभीत करने और यहां तक कि गरीबों से सबकुछ छीन लेने वाला तंत्र बनकर रह गई है। वह भी आम-जन को डराने और अत्याचार करने वाली संस्था बन गई है। ठीक वैसे ही जैसे पुलिस और नौकरशाही; आज विदेशी कंपनियों के पिट्ठू बनकर आम आदमी पर अत्याचार कर रहे हैं।न्यायपालिका के जन-विरोधी रूख के लिये दरअसल इसका ढांचा ही जिम्मेदार है। इसमें वर्गीय प्रतिनिधित्व, चयन की प्रक्रिया और सदस्यों का स्थायित्व आदि कई खामियों ने न्यायपालिका को जनता की पहुंच से दूर कर दिया है। सर्वोच्च न्यायालय में ज्यादातर जज ऊंची जाति और उच्च मध्यम वर्ग से आते हैं। इसलिए गरीबों के प्रति सहानुभूति तो शायद ही उनके मनों में होती है। न्यायाधीशों की चयन प्रक्रिया में ही अपारदर्शिता, निरंकुशता और भाई-भतीजावाद चलता है। जो व्यक्ति या अधिवक्ता उनके संघ के साथ मेल नहीं खाता और शासक वर्ग के साथ जिसका तालमेल नहीं है उसे चयन की प्रक्रिया से ही बाहर कर दिया जाता है। 1993 में न्यायपालिका ने संविधान की नई व्याख्या करके जजों की नियुक्ति की प्रक्रिया को कार्यपालिका के हाथों से छीन लिया और कार्यपालिका से स्वयं को 'मुक्त' करने के लिए न्यायपालिका ने सब किया। यह सब किया आजादी के नाम पर लेकिन गौर किया जाए तो इस सबसे न्यायपालिका की न तो स्वतंत्रता बढ़ी है; न ही न्यायपालिका में कोई सुधार ही हुआ है।अब देश की जनता के लिए समय आ गया है कि वह वर्तमान न्यायिक व्यवस्था और उस प्रक्रिया के खिलाफ आवाज उठाए, जिससे वह गरीबों को न्याय और अधिकारों की रक्षा करने के बजाय अत्याचारी शासक बन गई है।न्यायपालिका के सभी पक्षों और सारी कारगुजारियों को ध्यान में रखकर और विमर्श करके ही यह निर्णय लिया जाना चाहिए कि अब क्या किया जाए, इसी को ध्यान में रखते हुए गरीब और न्यायपालिका पर चर्चा के लिए सभाएं आयोजित की जायं . इस सभा में हम न्यायपालिका के ढांचे, कार्यों, कार्यवाहियों और व्यवहार पर विस्तार से चर्चा करें . यह चर्चा खासतौर पर गरीबों के प्रति न्यायपालिका के व्यवहार पर होगी। चर्चा में न्यायपालिका के कार्यों में बदलाव लाने वाले, ढांचागत परिवर्तनों का जवाब ढूढ़ने की कोशिश की जाये . ताकि न्यायपालिका आम आदमी के अधिकारों को लागू और रक्षा करने वाली बनें। इन परिवर्तनों को लागू करने के लिए हमें अफसरों पर दबाव डालने के लिए एक अभियान और राजनीतिक स्ट्रेटेजी बनाने की जरूरत है।हमें उम्मीद है कि जन आंदोलनों के प्रतिनिधि, ग्रासरूट संस्थाएं और दूसरे वे सभी लोग जो देश में न्यायपालिका की हालत पर चिन्तित हैं, ऐसी sabhaon में जरूर भागीदारी करें ।

मानव अधिकारों के संघर्ष के रास्ते में नयी चुनौती

मानव अधिकार के हनन में लगा महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग---------
वर्ष १९९६ में जब आल इंडिया ह्यूमन राइट्स एंड सिटीझन आफ्शन नामक संस्था की नीव रखी तो उस समय संस्था के उद्देश्यों में महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग की गठन के मांग को सबसे ऊपर रखा गया था । आयोग के गठन की मांग को लेकर संस्था ने वर्ष १९९६ से लेकर जब तक आयोग का गठन नही हो गया तब तक संघर्ष किया, रैलियां की, जनसभाए की, धरने-प्रदर्शन किए राज्य स्तरिय मानव अधिकार आयोग के गठन के लिए ज्ञापन दिए किन्तु यह सब करते समय हमे यह मालूम न था कि महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग का गठन हो जाने के पश्चात यह मानव अधिकार आयोग हम जैसे मानव अधिकारों के क्षेत्र में कार्य कर रहे मानव अधिकार कार्यकर्ताओं तथा स्वयंसेवी संगठनों एवं संस्थाओं को कुचलना ही अपना मुख्य उद्देश्य बना लेगा ।इस् विषय का हमे तब पता चला जब महाराष्ट्र के मंत्रालय में मैं उपस्थित था वहाँ मौजूद कुछ सचिव स्तर के अधिकारियों द्वारा महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग को "मलाईदार महकमा" के नाम से संबोधित करते हुए सुना तो हमे यह आभास हो गया कि किस तरह महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग भ्रष्टाचार का अड्डा बन चुका है । सरकारी महकमे मसलन पुलिस, महसूल, परिवहन, एवं महानगरपालिका आदि के अधिकारियों के विरुद्ध आयोग में आयी हुई शिकायतों को रफा-दफा करने हेतु सौदे किये जाने लगे है । आम आदमी जो यह समझता था कि कही न्याय मिले न मिले लेकिन मानव अधिकार आयोग में न्याय अवश्य मिलेगा आयोग द्वारा उनके इस् विश्वास को छला जाने लगा । आम आदमी को तो यह पता ही नही था कि उसके द्वारा कि गयी शिकायत मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ के तहत सुनवाई के योग्य है या नही इसका लाभ लेकर आयोग के सदस्यों ने उन सभी शिकायतों को यह कह कर खारिज करना शुरू कर दिया कि यह शिकायत मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ के तहत सुनवाई के योग्य नही है । और तो और पुलिस द्वारा व्यवसायी पर मकोका लगाए जाने के मामले को यह कह कर खारिज कर दिया गया कि यह दीवानी का मामला है । जिन मामलों में वे ऐसा नही कर पाए उन मामलों में शिकायतकर्ताओं को यह कह कर शिकायत पीछे लेने हेतु दबाव डाला जाने लगा कि पुलिस से अथवा सरकारी अधिकारियों से दुश्मनी मत मोल लो शिकायत वापस लेलो नही तो तुम्हे आगे काफी तकलीफ आयेगी, इतना ही नहीं आयोग द्वारा बिचौलिए की भूमिका निभाते हुए पुलिस अधिकारियों से पीड़ित को पैसे दिलाकर मामले को रफा-दफा किये जाने की बात होने लगी है, तथा शिकायतकर्ताओं को बिना सूचित किये सुनवाई बंद की जाने लगी ।मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ में यह कलमबद्ध किया गया है कि मानव अधिकारों के क्षेत्र में काम करने वाले स्वयंसेवी संगठनो, संस्थाओं को मानव अधिकार आयोगों द्वारा प्रोत्साहित किया जायेगा किन्तु महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग द्वारा स्थिति उलट दी गयी । जब कोई स्वयंसेवी संगठन जो कि मानव अधिकारों के क्षेत्र में काम कर रहे है उनके द्वारा रखे गए सेमिनार में वक्ता के रूप में मौजूद आयोग के सदस्य या कर्मचारी मसलन मानव अधिकार हनन के मामलों कि जांच के लिए आयोग में नियुक्त पुलिस अधिकारी अपने भाषण में यह कहना शुरू कर दिया है कि मानव अधिकार आयोग का किसी स्वयंसेवी संगठन या संस्था से कोई संबंध नहीं है यहाँ यह विचारणीय है कि अगर ये आयोग जनसंगठनो या संस्थाओं से संबंधों को नकार रहे है तो क्या वे आम जनता के मानव अधिकारों के लिए कार्य करेगे ? इसमें संशय है । आयोग के सदस्य और कर्मचारीगण स्वयम यह साबित करना शुरू कर दिया है कि "मानव अधिकार जो कि आम नागरिक का मुद्दा था उसे व्यवस्था द्वारा हड़प लिया गया है" उन्होने मानव अधिकार के क्षेत्र में काम करने वाले गैर सरकारी संगठनो तथा संस्थाओं पर हमले तेज कर दिए है उनके इन हमलों से पता चलता है कि मानव अधिकार आयोगों को ऐसे गैर सरकारी संगठन या संस्था जो कि मानव अधिकारों के क्षेत्र में कार्यरत है और आयोग के क्रियाकलापों पर नजर रख सकते है उनके द्वारा गलत किये जाने पर ऊँगली भी उठा सकते है ।दु:ख की बात यह है की महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग इससे भी दो कदम आगे जाकर मानव अधिकारों के क्षेत्र में पिछले १५ वर्षों से कार्यरत मानव अधिकार कार्यकर्ताओं के खिलाफ पुलिस के माध्यम से झूठे एफ.आई.आर. दर्ज कराने शुरू कर दिए है तथा मानव अधिकार के क्षेत्र में काम करने वाले संगठनों की जांच के नाम पर संगठनों, संस्थाओं के कार्यकर्ताओं को प्रताडित करना शुरू कर दिया है । यह सब आयोग में बैठे आयोग के सदस्यों एवं आयोग के जांच विभाग में बैठाये गए पुलिस कर्मचारियों के इशारे पर हो रहा है आयोग के सदस्य के द्वारा तो यहाँ तक कहते सुना गया है कि ऐसे सभी स्वयं सेवी संगठनों को बंद कराना है जो मानव अधिकारों के क्षेत्र में काम कर रहे है । प्रश्न यह है कि आखिर महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग की मंशा क्या है मानव अधिकार कार्यकर्ताओं के विरुद्ध झूठे एफ।आई.आर. दर्ज कराने से लेकर, जांच के नाम पर मानव अधिकार संगठनों को प्रताडित करना क्या यही मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ का उद्देश्य था, क्या संयुक्त राष्ट्रसंघ के मानव अधिकार विश्वघोषणा का उद्देश्य यही है ? जो महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग का उद्देश्य बनता नजर आ रहा है जब रक्षक भक्षक बन जाये तो उसके विरुद्ध उठ खडे हो जाना नितांत आवश्यक हो जाता है । ब्यवस्था की खामियों से संघर्ष करना ही मानव अधिकार आंदोलनों का पहला चरण है अब वह समय आ गया है जब हम सभी मानव अधिकारों के क्षेत्र में काम करने वाले स्वयंसेवी संगठनो एवं संस्थाओं तथा कार्यकर्ता एकजुट हों और महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग द्वारा भारी पैमाने पर किये जा रहे मानव अधिकार हनन के विरुद्ध संघर्ष शुरू करे ।

Friday, January 18, 2008

'वाचाल तर वाचाल'

'वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळे नसा झाला आहे. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरवल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. जवळ जवळ 80 टक्याच्या वर जनता निरक्षरच होती त्यामुळे वाचनाचा मक्ता काही सुधारलेल्या सु‍शीक्षित समाजापुरताच सिमीत होता आता शिक्षण सर्व सामान्यापर्यंत पहोचले आहे परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष वाचन आणि तेही कसदार वाचन निश्चितच कमी झालेले आहे.

भारतीय परंपरेत, आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्ञानाचा अमर्याद खजिना निरनिराळ्या पोथ्या, पुराणे, धार्मिक ग्रंथ यात साठविलेला आहे. पूर्वीच्या पिढीत मुठभर शास्त्री-पंडितांच्या हाती हे ज्ञानभांडार होते. ब्रिटिश काळांत इंग्रजी शिक्षणाच्या संस्कारतून प्रबोधन काळाची महूर्तमेढ रोवली गेली. नवशिक्षणातून ज्ञानाची नवीन खिडकी उघडली गेली. आणि पाश्चात्य, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांची ओळख आम्हाला झाली. त्यातून विचारांची नवी दिशा आम्हाला प्राप्त झाली. त्याचा आपल्या जीवन शैलीवर प्रभाव पडू लागला. पाश्चात्याचे अनुकरण करण्याची वृत्ती बळावली. यांच्यातील शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कर्तव्यत्परता इत्यादी गुणांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांची बिनधास्त, स्वैर आणि बेपर्वा वृत्ती आम्ही घेतली. संस्कारांची मातब्बरी आम्हाला वाटेनाशी झाली. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन आम्ही त्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करू लागलो. त्यांतून आपल्या संस्कृतीमधील काय मूल्यवान आहे याचे भान आम्ही हरवून बसलो व त्यांच्या संस्कृतीतील मूल्यवान गोष्टी स्वीकारण्याचे आम्ही टाळू लागलो.

सध्याची अवस्था तर एक प्रकारची कुंठावस्था आहे असे मला वाटते. लहानपणी जुन्या पिढीत मुलांच्या हातात इसापनीती, साने गुरूजींच्या संस्कारक्षम गोड गोष्टी, 'श्यामची आई' या सारखी पुस्तके असायची. आताची मुले अर्धे पान लिहिलेले असेल तर ते सुद्धा वाचायची तसदी घेत नाहीत. चित्रांच्या मार्फत 2-2 ओळींची माहिती संकलित केलेली कार्टून्स त्यांना जास्त आवडतात, दीर्घ कथा, लघु कादंबरी, मोठी वैचारिक पुस्तके, सुंदर कवितांचा संग्रह या गोष्‍टी तर त्यांच्या आजुबाजुला फिरकत सुद्धा नाही.

लहानपणी एकदा हा वाचन संस्कार झाला म्हणजे तो तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्थेपर्यंत कायम राहतो, यात शंका नाही. विविध प्रकारच्या कथा, कादंबर्‍या, कविता, ललित साहित्य यातून एक विलक्षण आल्हाद आणि आनंद व्यक्तीला प्राप्त होतोच शिवाय त्याचे जीवन समृद्ध, संपन्न मानते. मन खर्‍या अर्थाने श्रीमंत होते. वैचारिक ग्रंथांच्या वाचनातून त्याच्या बुद्धीला धार चढल्या वाचून रहात नाही.अलीकडे हा वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. पालकही याबाबत उदासीन झाले आहेत. शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या वैध/अवैध मार्गाचा अवलंब या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्य आणि पालक दोघेही अडकले आहेत .

त्यातून वेळ काढून निरपेक्ष, निखळ आनंद देणारे वाचन करण्यास त्यांना फुरसतच नाही. वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. खर्‍या अर्थाने मानुषतेचे मूल्य अंगी बाणते. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. माता, पिता, शेजारी, समाज आणि राष्ट्रापर्यंत आपली कही बांधिलकी आहे याची जाणीव जागृत राहते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

व्यथा मराठीच्या

मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले.

अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे? मातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली.

आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत. ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकवणार्‍यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.आर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.

गेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते. भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा. शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यमाच्या शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते? महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची संख्याही वाढती असावी. वेळोवेळी त्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.

नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे. महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे. मराठी भाषा व मराठी माणूस यांना केन्द्रीभूत धरून या समाजाच्या घटकांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय, शैक्षणिक इ. दृष्ट्रीकोनातून स्वतंत्र वेगवेगळ्या पातळींवर शास्त्रीय पाहणी करून त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष काय निघतात ते पाहणे मोठे उदबोधक ठरेल हे निश्चित. अशा निष्कर्षांवरून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने व्हायला हवी हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे काम हाती घ्यायला हरकत नाही. मराठी भाषा व भाषिकांच्या समस्या महाराष्ट्रापुरत्या वेगळ्या, तर महाराष्ट्राबाहेर भारतात म्हणजे बृहन्महाराष्ट्रात वेगळ्या, तसेच भारताबाहेर परदेशात आणखीन वेगळ्या आहेत. मराठी भाषा व संस्कृतीची पाळेमुळे महाराष्ट्रात असल्यामुळे तेथे खतपाणी जितके जास्त मिळेल तितकी त्याची फळे सुमधुर चाखायला मिळतील. राज्यकर्ते मराठी असल्याने या बाबतीतले नीतीनियम हवे तसे योग्य तर्‍हेने ठरवणे कठीण नाही. बृहन्महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा तर इतर प्रांतात मराठी व मराठीपण टिकविण्यासाठी हजाराहून अधिक संस्था धडपडत आहेत. त्यांची माहिती ''बृहन्महाराष्ट्र परिचय सूची'' या पुस्तकात अलिकडेच प्रसिध्द झाली आहे. बृहन्महाराष्ट्रात मराठी शिक्षणाच्या संस्था हळूहळू कमी होत आहेत. संस्थाचालक मराठी असले तरी मराठी शिक्षणाची तेथील लोकांना गरज वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी विद्यार्थी नाहीत अशी अवस्था आहे. इतर 'महाराष्ट्र मंडळ' किंवा 'समाज' नावाच्या संस्था आहेत. त्या आर्थिक दृष्ट्या तितक्या सबळ नाहीत. (अपवाद सोडून). तेव्हा महाराष्ट्र शासनाने व तेथील जनसामान्यांनी आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील. याबाबतीत महाराष्ट्राचा दूरदर्शीपणा कमी पडू नये.

भारताबाहेरचा मराठी समाज हा मुख्यत: धनिक वर्ग आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनार्थ कार्य करणे त्यांना सुलभ जाते. सर्व क्षेत्रातील मराठी श्रेष्ठ दिग्गज व्यक्तींना महाराष्ट्रातून आमंत्रित करून मराठीचा संपर्क कायम ठेवणे तेथे पैशाच्या पाठबळावर सोपे काम आहे. मराठीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ते भरपूर उपयोग करीत असतात. तिकडील मराठी संस्था व त्यांचे कार्यकर्ते मराठीच्या संवर्धनार्थ नेहमी प्रयत्नशील असतात. हे उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे. मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक स्वत:च्या अभिमानाखातर टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली?

खरे तर सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यात निरनिराळ्या भाषांची वर्चस्वासाठी स्पर्धा टाळता येणार नाही. मराठीपुरते बोलायचे तर मराठीने आपली खिडक्यादारे दुसर्‍यांना आत शिरण्यासाठी सदैव खुली ठेवली. आपण त्यांची भाषा शिकलो ते त्यांच्या भाषेतील साहित्य आमच्या भाषेत आणण्यासाठी. हा उदारपणा एकतर्फी असता कामा नये हे भान मात्र आम्ही ठेवले नाही. महाराष्ट्राजवळ व मराठी साहित्यात असलेला अमोल ठेवा इतर भाषिकांनी घ्यावा यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न झाले असले तर ते नगण्यच. तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत.

यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी. सुरूवातीस शंभर उत्कृष्ठ मौल्यवान मराठी ग्रंथांची निवड करून त्यांचे रूपांतर, भाषांतर निदान बंगाली, उडीया, तेलगु, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराथी, असामी, हिंदी भाषांमध्ये करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. तसेच या भाषांमधून स्वतंत्र मासिक अथवा द्वैमासिक काढून त्यातून मराठीतील निवडक ललित व इतर साहित्याचे अनुवाद प्रसिध्द करायला हवे. अनुवादकांची साखळी निर्माण करून यासाठी लागणारा खर्च व विक्री यंत्रणा उभी करायला हवी. निरनिराळ्या प्रांतातील मराठी भाषिक संस्थांनी या उपक्रमास हातभार लावायला हवा.

आम्ही आता एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, इ-मेल इ. सुविधा प्राप्त झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व जग एकमेकापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. या साधनांचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार प्रसारार्थ करायला हवा. दूरचित्रवाणीवर आता काही मराठी वाहिनी उपलब्ध झाल्याने मराठी कार्यक्रम बघण्याची सोय झाली आहे. परंतु मराठी वाहिनी किंवा रेडिओचे मराठी कार्यक्रम ज्या प्रमाणात संपूर्ण देशभर जायला पाहिजेत त्या प्रमाणात जात नाहीत ही दूरवरची खंत आहे. वाहिनी वितरक व केबलवाल्यांच्या मर्जीवर बर्‍याच जणांना अवलंबून राहवे लागते. यातून काही मार्ग काढायला हवा.

ध्वनीफीतींद्वारे मराठी संगीत घरोघरी ऐकण्यास खूपच मदत झाली. पुढील पिढ्यापर्यंत मराठी मातृभाषेचे प्रेम टिकून राहावे व वृध्दिंगत व्हावे यासाठी आजच्या पिढीने दूरदृष्टीने ही वाटचाल मार्गी लावणे फार आवश्यक आहे. मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जागतिक परिषद, साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ इ. सारख्या मराठीसाठी झटणार्‍या देशपरदेशातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केल्यास समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 'मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उपदेशाचे पालन करून मायमराठीचे ऋण फेडल्यासारखे होईल. जय मराठी!

Monday, January 14, 2008

यह शहर हादसों का शहर है।

यह शहर हादसों का शहर है। यहां कब क्‍या हो जाए, कुछ भी कहना मुश्किल है। जैसे आज सुबह मेरे ऑफिस के करीब वाले मॉल में एक आदमी को चाकू घोपकर मारने का प्रयास किया जाता है और कुछ ही देर में यहां पुलिस के साथ प्रेस वालों का जमावड़ा खड़ा हो जाता है और यह जमावड़ा इस पोस्‍ट को लिखने तक वहीं पर खड़ा है। इसमें आईबीएन7, आज तक, स्‍टॉर न्‍यूज से लेकर स्‍थानीय चैनल वाले तक शामिल हैं। कुछ अखबार वाले भी हैं लेकिन उन्‍हें पहचाना थोड़ा मुश्किल है। सब अपने अपने ढ़ंग से स्‍टोरी बनाने में जुटे पड़े हैं।मामला यह है कि मैग्‍नेट मॉल के सुपरवाइजर की हत्‍या का प्रयास किया जाता है और कारण यह था कि उसने अपने एक पूर्व कर्मचारी को वेतन नहीं दिया था। अब आप सोच रहे होंगे कि आखिर इतनी छोटी सी वजह से हत्‍या कैसे की जा सकती है लेकिन यह प्रयास हुआ है। बात देखने में भले ही छोटी लगे लेकिन यहां हमें यह देखना होगा कि तीन हजार रुपए की पगार पर काम करने वाले उस व्‍यक्ति के घर की माली हालत कैसी होगी। उसका एक परिवार होगा, जिसमें उसकी पत्‍नी, मां बाप और बच्‍चे होंगे। ऐसे में यदि तीन हजार रुपए यानि उसे पगार नहीं मिले तो उसके घर में कई दिनों तक चूल्‍हा नहीं जला होगा। तभी तो उसे इतना बड़ा कदम उठाना पड़ा होगा। मैं उस व्‍यक्ति के अपराध को सही नहीं ठहरा रहा हूं लेकिन मुंबई में लाखों की तादाद में ऐसे लोग हैं जो कि हर रोज दो जून की रोटी के लिए लड़ते हैं। इनके सामने जिंदा रहने का सकंट है। हजारों की तादाद में हर रोज इस शहर में आते हैं। कुछ यहीं अपने अस्तिव के लिए लड़ते हैं तो कुछ वापस अपने गांव या शहर चले जाते हैं। ऐसा है यह शहर। वाकई मुंबई हादसों का शहर है।