Thursday, June 24, 2010

Rajeshwari Media Consultant

वृत्तपत्र क्षेत्रात होत असलेल्या एकूणच स्थित्यंतरामुळे तसेच आधुनिक माहिती-वृत्तपत्र क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. वृत्तपत्र कागद, शाई व इतर पुरक सामुग्रीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दिवसेंदिवस वृत्तपत्र चालविणे अगदी जिकरीचे झाले आहे.

वृत्तपत्र चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत वाढती स्पर्धा, कामातील दगदग, ताणतणाव आदी कारणांमुळे अनेकवेळा लोकांच्या समस्या, अडीअडचणी सोडवित असताना स्वत:ची जबाबदारी, कर्तव्ये मात्र आपण विसरून जातो. आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणिव असूनही आपण वेळेअभावी कधीकधी आपली कामे वेळच्या वेळी न केल्याने त्याचा भुर्दंड सोसावा लागल्यावर मात्र आपण ठिकाणावर येतो.

याची काळजी घेणारा, योग्य सल्ला देणारा आपल्याला पाहिजे का?


आपल्या वृत्तपत्राची संपूर्ण तांत्रिक बाबी सांभाळणे, वृत्तपत्राचा दर्जा सुधारणे, फेब्रुवारी अखेरीस आरएनआयचे विवरणपत्र (फॉर्म II व फॉर्म IV, VIII, व फॉर्म XII ) भरून सुपूर्द करणे, एप्रिल अखेरीस आरएनआयचे विवरणपत्र (फॉर्म II ) तसेच वार्षिक अहवाल भरून पाठविणे, शासकीय जाहिराती मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या डीजीआयपीआर तसेच केंद्र शासनाच्या डीएव्हीपी या कार्यालयांशी संपर्क ठेवणे, आरएनआय कार्यालय, अधिपरिक्षक, पुस्तके व पकाशने यांच्याशी संपर्कात रहाणे, त्यांच्या कायदेशीर बाबी, तांत्रिक बाबी नियमितपणे पूर्ण करणे, या कामांसाठी वेळेवर योग्य निर्णय घेणारा आपल्याला हवा आहे काय?

मुंबईतील अनुभवी व प्रख्यात असलेल्या राजेश्वरी मिडीया कन्सल्टन्स्‌ या संस्थेमार्फत आपणास योग्य मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी आपण इच्छूक असल्यास कृपया त्वरीत संपर्क साधा.

राजेश्वरी मिडीया
राजेश सावंत


मालक, मुद्रक, पकाशक, संपादक यांनी दरवर्षी प्रेस रजिस्टार, आरएनआय व डीएव्हीपी साठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

आरएनआय सर्टिफिकेट
सी. ए. सर्टिफिकेट (वार्षिक अहवाल)
आरएनआय फॉर्म - विवरणपत्र (फॉर्म II) (वार्षिक अहवाल)
आरएनआय फॉर्म- (फॉर्म II व फॉर्म IV, VIII, व फॉर्म XII )
कोर्टातील डिक्लेरेशन
पोस्टाचा परवाना
इन्कम टॅक्स फाईल/पॅन नंबर
डीजीआयपीआर आदेश
कागद खरेदी बिले/पेमेंट वॉवचर्स
प्रिंटींग ऑर्डर बिले/पावत्या
वितरणासंबंधी दैनिक रिपोर्ट/ आठवड्याचा रिपोर्ट
वितरणासंबंधी तालुका/जिल्हावार वाहतुकीची बिले/पेमेंट वॉवचर्स
वितरणासंबंधी तालुका/जिल्हावार ब्रेक अप
प्रिंटींग प्रेसचे ऑर्डर बिल/प्रिंटींग बिल
प्रिंटींग प्रेसचे पेमेंट वॉवचर्स/बिले
वितरणासंबंधी मासिक इन्कम बिले/पावत्या
वितरणातील रद्दीची बिले/वॉवचर्स
मुख्य कार्यालयातील खर्च/स्टेशनरी बिले/ वेतन वॉवचर्स

1 comment:

Unknown said...

Details about rni ragistration with fee